breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रामकृष्ण मोरे सभागृहात नुतनीकरणाची ढोंगबाजी, जून्या बाराशे खुर्च्या बसविण्यास सुुरुवात

स्थापत्य कार्यकारी अभियंता संजय घुबे यांचे दुर्लक्ष 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह आणि संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या दुरुस्तीसाठी बंद आहे.  संबंधित नाट्यगृहांचे काम पूर्ण होण्यास विलंब लागत असल्याने नाट्य कलावंत आणि नाट्यरसिकांची गैरसोय होत आहे. प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाचे काम पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर उजाडणार आहे, तर अत्रे रंगमंदिराचे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. परंतू, प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाचे नुतनीकरण करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला असताना सभागृहात तब्बल 1200 खुर्च्या जून्याच बसविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाचे एक मेपासून नूतनीकरण सुरू आहे. हे प्रेक्षागृह नूतनीकरणासाठी मे महिन्यापासून बंद आहे. सध्या नाट्यगृहाचे प्रवेशद्वार आणि दर्शनी बाजूचे स्थापत्यविषयक काम, नाट्यगृहाची अंतर्गत सजावट, छत, स्वच्छतागृह व फ्लोअरिंगची दुरुस्ती, ॲटोमॅटिक वातानुकूलित व्यवस्था, रंगमंच सुधारणा, अग्निशमन यंत्रणा, ध्वनिव्यवस्था, पडदे, सौरऊर्जा यंत्रणा, कॅफे टेरिया, कलाकारांच्या ग्रीनरूमचे नूतनीकरण आदी कामे सुरू आहेत. नाट्यगृहाची दर्शनी बाजू आकर्षक करण्यासाठी काही म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी दिलेली चार महिन्यांची मुदत संपलेली आहे. अद्याप मोठ्या प्रमाणावर काम शिल्लक आहे.  त्यासाठी १७ कोटी सात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या नाट्यगृहाचे प्रवेशद्वार आणि दर्शनी बाजूचे स्थापत्यविषयक काम सुरू आहे. त्याशिवाय, नाट्यगृहाची अंतर्गत सजावट, छत, स्वच्छतागृह व फ्लोअरिंगची दुरुस्ती, ॲटोमॅटिक वातानुकूलित व्यवस्था, रंगमंच सुधारणा, अग्निशमन यंत्रणा आदी कामे सुरू आहेत.

नाट्यगृहाची दर्शनी बाजू आकर्षक करण्यासाठी काही म्युरल्स बसविण्यात येत आहेत. ध्वनी व्यवस्था, पडदे, सौरऊर्जा यंत्रणा, कलाकारांच्या ग्रीनरूमचे नूतनीकरण आदी कामे नियोजित आहेत. ऑक्‍टोबरअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, अद्यापही मोठ्या प्रमाणावर काम शिल्लक आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरपर्यंत हे काम पूर्ण होईल की नाही, याविषयी साशंकता आहे.

संत तुकाराम नगर येथील आर्चाय अत्रे रंगमंदिर हे वीस वर्ष जुने आहे. येथील खुर्च्या, स्वच्छतागृहे आदी भौतिक सुविधांची दुरवस्था झाली होती. नाट्यगृहात विविध सुविधा देण्यासाठी २४ ऑगस्ट २०१७ पासून नूतनीकरणाला सुरवात झाली. नवीन खुर्च्या, फॉल्स, सीलिंगचे काम, रंगमंचावरील मंडपी, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा आदी कामे सुरू आहे. त्याशिवाय, इलेव्हेशन, लॉबीचा विस्तार, कलाकारांसाठी ग्रीनरूम, नाट्यगृहाचे अंतर्गत काम करण्यात येत आहे. जानेवारी २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यासाठी मुदत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button