Uncategorized

खंडणीखोर, ब्लॅकमेलर जोडीला आता घरी बसवा : संदीपान झोंबाडे

मिशन- PCMC : सीमा सावळे यांच्या कारभारावर सडकून टीका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या धरणीवर प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-गवळीमाथा-बालाजीनगर स्पाईन रस्त्यातील नागरिकांमध्ये संपत्तीचा सवाल उभा राहिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी सहा वर्षांत आपली संपत्ती तब्बल ४ हजार ३०० पट वाढविल्याचे निवडणूक शपथपत्रातून समोर आले आहे. किवळेतील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या आणि इंद्रायणीनगरमध्ये नगरसेवक म्हणून आपल्या डोक्यावर बसू देवू नका. या खंडणीखोर जोडीला कायमचे घरी बसवा, अशी सडकून टीका सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे यांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे यांनी नागरिकांशी बोलताना जाहीरपणे गंभीर आरोप करत म्हटले की, “गोरगरीब झोपडीधारकांच्या प्रभागात राहणाऱ्या नागरिकांवर महागाई, बेरोजगारी आणि करांचा ओझा असताना सीमा सावळे यांनी आपल्या संपत्तीत असं भयंकर प्रमाणात वाढ कशी केली? ही संपत्ती महापालिकेतील भ्रष्टाचारातून कमवण्यात आली असल्याचे अनेक पुरावे दर्शवितात. ही बाब गंभीर बाबीची चौकशी झाली पाहिजे.

झोंबाडे यांनी पुढे नमूद केले की, “संपत्तीची ही वाढ फक्त वैयक्तिक संपन्नतेचा आलेख दाखवते, प्रभागातील विकासाची नाही. निवडणूक आयोगाने आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करावी. लोकशाहीत जनतेसमोर पारदर्शकता आवश्यक आहे आणि नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रकरणांवर विचार करून मतदान करणे गरजेचे आहे.”

हेही वाचा –  निगडीतील दुर्गा टेकडी परिसरात बिबट्याचा वावर, वन विभागाला तातडीची कारवाई करण्याची मागणी

संदीपान झोंबाडे यांचे आरोप एकदा वाचाच…

1. पुरुषांच्या जागेवर महिला का? तीनवेळा नगरसेवक झाल्यावर पोट कसं भरत नाही. किती खावं… किती कमवावं. कुठं ठेवावं… हा देशसुद्धा कमी पडला आहे. जर्मनीला पैसा… जपानला पैसा… कॅनडाला पैसा.. ठेवला आहे.

2. 2017 साली मालमत्तेचे शपथपत्रात 2 लाख 32 हजार उत्पन्न दाखवलं होतं. त्यामध्ये तब्बल ४ हजार ३०० पट वाढ झाली. जोडगोळीने कुणालाही जगू दिलं नाही.

3. शहरात सर्वत्र ब्लॅकमेलींग केली. मूर्तीजापूरला विधानसभा लढवताना 6 लाखाचं उत्पन्न होतं. मग, 2019 नंतर तुमची प्रॉपर्टी 3 कोटीच्या पुढं कशी गेली. कायदेशीत एव्हढी मालमत्ता आहे. बेकायदेशीर मालमत्ता आपल्याला शोधावी लागेल.

4. सर्व उमेदवार प्रभागात राहातात. पण, हा उमेदवार किवळे येथील लोढा नावाच्या उच्चभ्रू सोसायटीत राहतो. त्या सोसायटीचे ते चेअरमन आहेत. भाडेकरुनला चेअरमन होवून शकतो का? ते सांगतात मी भाड्याने राहाते. महिला 15 हजार सर्विस चार्ज भरावा लागतो.

5. देवाला विरोध, धर्माला विरोध देशाला विरोध… करायचा आणि माझ्याबाबत नॅरेटीव केले जात आहे. त्यांचे खायचे दात वेगळे… दाखवायचे दात वेगळे… त्यांचा चेहऱ्यावर आता नैराश्य आलेले आहे.

6. आम्ही या प्रभागात त्या उमेदवाराविरोधात तीनवेळा निवडणूक लढवली. आता ऑपरेशन करायला डॉक्टरला आणले आहे. त्यांना आता कायमचे जपान-जर्मनी-कॅनडाला पिकनिकला कायमचे पाठवा.

सीमा सावळेंच्या संपत्तीत ४ हजार ३०० पट वाढ…

सदर प्रकरण नागरिकांमध्ये संताप निर्माण करत असून, सीमा सावळे यांनी २०१७ मध्ये निवडणूक शपथपत्रात २ लाख ३२ हजार रुपये संपत्ती दाखविली होती, तर २०२५ मध्ये ती ३ कोटी २९ लाख २ हजार ५१९ रुपये झाली आहे. या आकड्यांवरून स्पष्ट होते की संपत्तीमध्ये सहा वर्षांत तब्बल ४ हजार ३०० पट वाढ झाली आहे.

झोपडपट्टीतील गोरगरीब नागरिकांना आश्चर्य वाटत आहे की, त्यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडत नसतानाही सत्ताधाऱ्यांची संपत्ती अशा भयानक प्रमाणात कशी वाढू शकते. संदीपान झोंबाडे यांनी नागरिकांना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे आणि भ्रष्टाचाराविरोधी चळवळीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button