सुरेश तात्या म्हेत्रे यांचे प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुभवी नेतृत्व!
मिशन- PCMC : चिखली परिसरात भाजपाच्या पॅनेलची आघाडी

पिंपरी-चिंचवड | भोसरी विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १ मध्ये आगामी काळातील विकासाचे व्हिजन पाहता, आमदार महेश दादा लांडगे यांचे कट्टर समर्थक सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या नावाची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. अनुभव, चारित्र्य आणि शिक्षण या सर्व गुणांनी समृद्ध म्हेत्रे यांना प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी योग्य नेतृत्व मानले जात आहे.
प्रभावी जनसंपर्क आणि उत्तम वक्तृत्व यामुळे प्रभागातील नागरिकांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले आहे. आमदार महेश दादा लांडगे यांनी चिखली आणि परिसराचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून, प्रभागातील पाच डीपी रस्त्यांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. तसेच चिखली जलशुद्धीकरण प्रकल्प, टाऊन हॉल, संतपीठ, शाळा आणि अंतर्गत रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांकडून संतोष साने यांच्यावर प्राणघातक हल्ला

प्रशासकीय अनुभव आणि आमदारांशी असलेले निकटचे संबंध यामुळे प्रभागातील सोसायट्यांचे प्रश्न आणि नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी सुरेश तात्या म्हेत्रे हेच सक्षम पर्याय असल्याचे नागरिकांचे मत आहे. प्रभाग क्रमांक १च्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असल्याची भावना लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे.
सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या प्रचाराला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, चिखली परिसरातील लोकांचा विश्वास आहे की, म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश दादा लांडगे प्रभागातील विकासकामांची गती कायम राखतील. सध्या प्रभागातील नागरिक सुरेश तात्या म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या सुधारणा आणि विकासाच्या कामांसाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.




