श्री गणेश सहकारी बँकेच्या संचालकपदी जवाहर ढोरे, अशोक कवडे बिनविरोध; नवनिर्वाचितांचा सत्कार!
सभासदांच्या विश्वासाला न्याय देत बँकेची प्रगती अधिक वेगाने करण्याचा निर्धार

पिंपरी- चिंचवड : नवी सांगवी येथील श्री गणेश सहकारी बँकेच्या निवडणुकीत जवाहर ढोरे आणि अशोक कवडे यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले की, श्री गणेश सहकारी बँकेने नेहमीच सर्वसामान्य सभासदांच्या हिताला प्राधान्य देत विश्वास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कामकाजाची परंपरा जपली आहे. भविष्यातही हीच परंपरा कायम ठेवत बँकेची प्रगती अधिक वेगाने करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
हेही वाचा – शासनाचा मोठा निर्णय: १ ऑगस्टपासून सर्व शासकीय आणि संवेदनशील दस्तऐवजांसाठी ‘डिजिटल स्वाक्षरी’ अनिवार्य!
सहकार क्षेत्र अधिक सक्षम व्हावे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक बळ मिळावे आणि सहकार चळवळ गतिमान व्हावी, या उद्देशाने केंद्र सरकारने सहकार क्षेत्राला नवी दिशा दिली असून, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला अधिक बळ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. श्री गणेश सहकारी बँकही सभासदांचा विश्वास संपादन करत प्रगतीची नवी शिखरे गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष संतोष देवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय बाईत, संजय जगताप, राजेंद्र राजापुरे, नगरसेवक शशिकांत कदम, मधुकर रणपिसे, शिवलिंग किंग, सुरेश तावरे, अंकुश (आप्पा) जवळकर, प्रमोद ठाकर, शिवाजी शिंदे, उद्धव पटेल, शैला जगताप, राजश्री जाधव यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, सभासद आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“श्री गणेश सहकारी बँकेने विश्वास, पारदर्शकता आणि सभासदाभिमुख कामकाजाच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. नवनिर्वाचित संचालक जवाहर ढोरे आणि अशोक कवडे यांच्या अनुभवाचा बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निश्चितच उपयोग होईल, असा मला विश्वास आहे. सहकार चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करणे ही काळाची गरज असून, सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत बँक प्रगतीची नवी शिखरे गाठेल. नवनिर्वाचित दोन्ही संचालकांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.”
– शंकर जगताप, आमदार, चिंचवड विधानसभा.





