Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिक्षात प्रवाशांच्या ऐवजी बसला भलामोठा अजगर

टिटवाळा : सकाळी तुम्ही घराबाहेर पडलात आणि तुमच्या समोर मोठा अजगर आला तर? या घटनेची साधी कल्पनाही करवत नाही. पण असात प्रकार टिटवाळ्यामध्ये घडला आहे. रिक्षात प्रवाशांच्या ऐवजी भलामोठा अजगर येऊन बसल्याची घटना घडली आहे. ही घटना टिटवाळा शहरात घडली असून अजगराला पाहताच रिक्षा चालकासह प्रवाशांची पळापळ झाल्याची घटना समोर आली आहे.

रिक्षाचालकाने घेतला सुटकेचा निश्वास…
पावसाळ्यात विषारी – बिन विषारी साप मोठ्या प्रमाणात मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अश्याच एका घटनेत टिटवाळा परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये तब्बल ५ फुटी अजगर शिरल्याने भयभीत झालेल्या रिक्षा चालकाने वॉर फाऊंडेशनच्या सर्पमित्राला संपर्क केला. त्यानंतर माहिती मिळताच सर्पमित्र सागर म्हात्रे यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्या अजगराला रिक्षातून पकडून एका ड्रममध्ये बंद केले. अजगर पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

अजगराला निसर्गच्या सानिध्यात सोडून केले मुक्त…
या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गच्या सानिध्यात सोडून अजगराला मुक्त केल्याची माहिती देण्यात आली आहे. अजगराला निसर्ग मुक्त करताना वॉर फाऊंडेशन अध्यक्ष योगेश कांबळे, प्राणी मित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला, रोमा त्रिपाठी आणि वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे व वनरक्षक दळवी उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button