इंद्रायणीनगर प्रभाग ८ मधील भाजपच्या उमेदवारांची प्रचारात आघाडी
मिशन- PCMC : विलास मडिगेरी यांनी केलेल्या विकासकामांबद्दल समाधान

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा रंगात आला असताना प्रभाग क्रमांक ८ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. सेक्टर, बालाजी नगर परिसरात घेतलेल्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी दिलेले प्रेम, आशीर्वाद आणि विश्वास हेच आमचे खरे बळ असल्याची भावना भाजपच्या उमेदवारांनी व्यक्त केली.
पार्लमेंट ते पालिका राहिलेल्या भाजप पक्षाची विकासाची सातत्यपूर्ण वाटचाल, विश्वासार्ह कार्यपद्धती आणि सक्षम नेतृत्वासाठी कमळ चिन्हाला साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी उमेदवारांनी नागरिकांना केले. होम टू होम, सोसायटी भागात जाऊन मतदारांशी संवाद साधत समस्यांची व नवीन सूचनांची माहिती घेऊन त्यावरील उपाययोजनांची हमी देण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून करण्यात आला.
हेही वाचा – नव्या युगाचे नेतृत्व, विकासाचा नवा ध्यास: आशाताई भोंडवे यांचा ‘व्हिजनरी’ जाहीरनामा
भाजपचे अधिकृत उमेदवार (अ) डॉ. सुहास कांबळे, (ब) नम्रता लोंढे, (क) निलम लांडगे आणि (ड) विलास मडिगेरी हे उमेदवार मैदानात असून, प्रभागातील विकासकामे गतीमान करण्यासाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. आगामी निवडणुकीत नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद सकारात्मक असून विजय निश्चित असल्याचा विश्वासही भाजप पदाधिकारी व्यक्त करत आहेत.
प्रचारदौऱ्याचे नेतृत्व भाजपचे उमेदवार विलास मडिगेरी करत असून त्यांनी आतापर्यंत प्रभागात केलेल्या विविध विकासकामांचे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. रस्ते विकास, डांबरीकरण व मूलभूत सुविधांच्या दुरुस्तीसाठी मडिगेरी यांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका रहिवाशांनी विशेषत्वाने अधोरेखित केली. त्यांच्यासह भाजपचे चारही उमेदवार निवडून आल्यानंतर विकासकामे मार्गी लावतील, हा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




