ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजप प्रचार गाजला; ४५० कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मिशन- PCMC : प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ (दिघी–बोपखेल) मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला. या प्रचारात सुमारे ४५० कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थक उत्साहात सहभागी झाले.

भाजपचे अधिकृत उमेदवार श्रुती विकास डोळस, कृष्णा भिकाजी सुरकुले, हिरानानी गोवर्धन घुले आणि उदय दत्तात्रय गायकवाड यांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला. शिवनगरी, शिवसाई कॉलनी, दत्त कॉलनी, गणेश मंदिर परिसर, निरंकारी कॉलनी आणि बुद्ध विहार या भागांत प्रचार मोहिम जोरदार पार पडली.

हेही वाचा     :        तुषार सहाणे यांना निवडून द्या, तुमच्या प्रश्नांना सोडविण्याची जबाबदारी माझी : उपमुख्यमंत्री अजित पवार 

उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत सुविधांचा आढावा घेत स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि सामाजिक विकास याबाबत मतदारांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांनी “विकासासाठी भाजप”, “प्रभाग क्रमांक ४ मध्ये कमळ फुलवा” अशा घोषणांद्वारे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. नागरिकांकडून उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला, ज्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या विजयाची दृष्टी स्पष्ट होत आहे.

घरोघरी प्रचार दौरा संपल्यानंतर सर्व उमेदवार व कार्यकर्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या भोसरी पीएमटी चौक येथून सुरू होणाऱ्या भव्य रोडशोमध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले. या रोडशोमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. भाजप कार्यकर्त्यांनी या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये उमेदवारांना मोठे जनसमर्थन मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button