Uncategorized

विकासनगर–किवळे भागात भाजप पॅनलच्या उमेदवारांचा झंझावात

किवळे  : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीने विकासनगर–किवळे परिसरात प्रचाराचा वेग वाढवला असून, भाजप पॅनलचा झंझावात पाहायला मिळत आहे. नियोजनबद्ध प्रचार, संघटित कार्यकर्त्यांची ताकद आणि विकासकेंद्री मुद्द्यांमुळे युतीचा प्रचार प्रभावी ठरत आहे.

घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत उमेदवार विकासाचा विश्वास व्यक्त करत आहेत. भाजप–आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार धर्मपाल तंतपाळे (अ गट), शिल्पा राऊत (ब गट), माजी नगरसेविका संगिता भोंडवे (क गट) आणि दिपक भोंडवे (ड गट) यांनी विकासनगर, किवळे गावठाण, मुख्य रस्ते तसेच अंतर्गत भागांत पदभ्रमण केले.

यावेळी गोपाळ तंतरपाळे, राजेंद्र भोंडवे, अमोल भोंडवे, नवनाथ राऊत, अमोल राऊत, रघुवीर शेलार यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा –  खंडणीखोर, ब्लॅकमेलर जोडीला आता घरी बसवा : संदीपान झोंबाडे

पदयात्रेदरम्यान नागरिकांनी रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि आरोग्य सुविधांबाबत अपेक्षा मांडल्या. गेल्या काही वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा आढावा देत, पुढील काळात अधिक नियोजनबद्ध, लोकाभिमुख आणि पारदर्शक विकास करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला.

विकासाच्या मुद्द्यावर मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, प्रभागात भाजप पॅनलबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button