Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपुणे

गाडी चोर निघाला बकऱ्या चोर; चोरीच्या ‘स्टाईल’ने पोलीसही चक्रावले

पुण्यात देखील आश्चर्य चकित करणारी चोरीची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीकडून तब्बल ६ सहाचाकी , ४ चारचाकी आणि २६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. पण गुन्हेगाराच्या हुशारीने पोलीस देखील चक्रावून गेले. 

पुण्यातील खडकी  पोलिसांनी  २२ वर्षांच्या अलेक्स लवरेन्स ग्राम्सला अटक केली आहे. तो खडकी बाजारातील एका गुन्हेगारी टोळीचा सदस्य आहे. त्याने आतापर्यंत हजारपेक्षा अधिक बकऱ्या चोरल्या आहेत.

वाचा- 1 जानेवारीला पुणे-नगर महामार्ग बंद, एल्गार परिषदेला परवानगी नाही

काय लढवली शक्कल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी बाजार येथील गुन्हेगारी टोळीतल्या साथीदारांसोबत तो गाड्या चोरत होताच पण या गाड्यांचा वापर ते विकण्याऐवजी बकरी चोरण्यासाठी करत होते. गावाबाहेर कमी गर्दीच्या ठिकाणच्या गोठ्यात ते एखादा गोठा किंवा बकरी बांधलेले ठिकाण निश्चित करत असत. त्यानंतर चोरलेल्या गाडीत बसून चार ते पाच सदस्य बकरी चोरण्यास मध्यरात्री जात असत. बकरी ओरडण्याचा आवाज आत झोपलेल्या व्यक्तींना येऊ नये म्हणून चारचाकीचा आवाज सुरु ठेवला जायचा. बकरीच्या जिभेला बाभळीचा काटा लावला जात होता. आणि मग अशा अनेक बकऱ्या घेऊन ते आठवडे बाजारात विकत होते.  सुशिक्षित तरुणाने चलाखी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या या बकरी चोऱ्याची चर्चा मात्र सर्वत्र सुरु आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button