Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीउद्योग विश्व । व्यापारताज्या घडामोडी

भारतातील विमान इंजिन निर्मिती क्षेत्रात आघाडी

मुंबई: गोदरेज एंटरप्रायझेस समूहाच्या एरोस्पेस विभागाने भारतातील विमान इंजिन निर्मिती क्षमता भक्कम करण्यास पुढाकार घेतला आहे. अत्याधुनिक इंजिनिअरिंग आणि आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या कामाच्या जोरावर कंपनीने हे यश मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्यांचा विश्वास प्राप्त झाल्याने गोदरेज या क्षेत्रात आता भरीव कामगिरी करत आहे. गोदरेज एरोस्पेस ही भारतातील विमान इंजिनचे सर्व भाग तयार करणारी एकमेव खासगी कंपनी आहे. यामुळे देशाच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेत कंपनीने मोलाचा वाटा उचलला आहे. ही कामगिरी देशाच्या प्रगत तंत्रज्ञान क्षेत्राला नवी दिशा देत आहे.

१९८० च्या दशकात गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपने एरोस्पेस व्यवसायाची स्थापना केली. अगदी स्थापनाकाळापासूनच कंपनीचा हा विभाग देशातील अनेक महत्त्वाच्या मोहिमांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून सहभागी झाला आहे. आज हा व्यवसाय जागतिक एरोस्पेस क्षेत्रातील एक प्रमुख नाव म्हणून नावारुपास आला आहे. कंपनी बोईंग, सॅफरन एअरक्राफ्ट इंजिन्स, जीई एरोस्पेस, रोल्स-रॉइस आणि RTX यांसारख्या दिग्गज जागतिक कंपन्यांसोबत काम करत आहे. उच्च दर्ज्याच्या गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करताना कामात कोणतीही उणीव दिसून येत नसल्याने गोदरेज एंटरप्रायझेस कंपनीने जागतिक व्यापारातील महत्त्वाच्या कंपन्यांशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आव्हानात्मक यंत्रणांचा पुरवठा करणे ही कंपनीचे खास वैशिष्ट्य मानले जाते. वार्षिक पातळीवर या व्यवसायाने सुमारे २५ टक्के मोठी प्रगती केली आहे. कंपनीच्या निर्यातीत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जागतिक एरोस्पेस पुरवठा साखळीत या व्यवसामुळे कंपनीने आपला भक्कम पाया रोवला आहे. उत्कृष्ट दर्जा आणि वेळेवर वितरण यामुळे कंपनीचा दबदबाही वाढला आहे.

कंपनीची वाटचाल पाहता भविष्यातील नियोजनांसाठी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत. पुढील तीन वर्षांत १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल, असे कंपनीने जाहीर केले आले. कंपनी आता प्रगत डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानावर भर देणार आहे, याकरिता कंपनीने स्वतःचे संशोधन व विकास केंद्र उभारले आहे. या केंद्रात विमानांच्या यांत्रिक प्रणालींसाठी खास डिझाइन कार्यालयाची सोय करण्यात आली आहे. कंपनीच्या प्रगतीसाठी या केंद्राची स्थापना महत्त्वाची मानली जात आहे. आता कंपनी केवळ दिलेल्या आराखड्यावर काम न करता स्वतःचे खास तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. या बदलांमुळे कंपनीचा अभियांत्रिकी क्षमताही मजबूत होईल, असा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला. नवोन्मेषावर आधारित विकासासाठी हे पाऊल मैलाचा दगड ठरेल, परिणामी जागतिक बाजारपेठेत कंपनीचे स्थान उंचावेल, अशी आशाही व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा –  आता चुकला की Playoff ला मुकला… जाणून घ्या सर्व सघांची स्थिती अन् नॉक आऊटची संधी

एरो इंजिन क्षेत्राचा विकास हा सखोल अभियांत्रिकी क्षमता आणि उच्च दर्जाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. यासाठी लवचिक पुरवठा साखली आणि विश्वासार्ह कामगिरी अत्यंत आवश्यक असते. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तोच प्रवासाचा आधार आहे. महत्त्वाच्या एरोस्पेस प्रणालींचे भारतातच उत्पादन करण्यासाठी आम्ही वचनबद्द आहोत. आम्ही नवनवीन शोध, प्रगत उत्पादन तंत्रज्ञान आणि मनुष्यबळ विकासावर सातत्याने गुंतवणूक करत आहोत. भारताचे एरो इंजिन क्षेत्रातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोदरेज सज्ज आहे. जागतिक एरोस्पेस मूल्य साखळीमध्ये आमचे योगदान महत्त्वाचे ठरेल. भविष्यातील प्रगतीसाठी आम्ही पूर्ण ताकदीने करत आहोत.”

गोदरेज एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रणाली स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केल्या आहेत. यामध्ये अक्युएटर्स सारख्या क्लिष्ट यंत्रणांचा समावेश आहे. कंपनीसाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. अशा प्रगत प्रणाली तयार कऱण्याची क्षमता असलेल्या मोजक्या भारतीय कंपन्यांमध्ये गोदरेचा समावेश झाला आहे. या यशामुळे कंपनीची ओळख आता बदलली आहे. कंपनी आता केवळ सुटे भाग बनवणारी राहिलेली नाही. त्याऐवजी, ती आता एरोस्पेस क्षेत्रातील एक संपूर्ण डिझाइन आणि इंजिनिअरिंग भागीदार बनली आहे. आता ही कंपनी एकात्मिक एरोस्पेस प्रणाली देण्यास सक्षम आहे. हे परिवर्तन भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. यामुळे आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाला मोठे बळ मिळणार आहे. ही प्रगती गोदरेजच्या तांत्रिक कौशल्याचा पुरावा आहे, असे गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या एरोस्पेस व्यवसायाचे बिझनेस प्रमुख माणेक बेहरामकामदिन म्हणाले.

चौख अभियांत्रिकी, गुणवत्तेची कडक शिस्त आणि दीर्घकालीन क्षमता बांधणमी यांवर गोदरेजने आपला भार दिला आहे. यामुळे एरोस्पेस उत्पादनाच्या क्षेत्रात भारताचे स्थान जागतिक स्तरावर मजबूत होत आहे. गोदरेज आता जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे येत आहे. जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारताची औद्योगिक ताकद वाढवण्यासाठी हे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. या उपक्रमांमुळे देशाला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळत आहे. दर्जेदान उत्पादनांमुळे गोदरेजने विश्वासार्हता जपली आहे. भारताला एरोस्पेस क्षेत्रातील प्रमुख केंद्र बनवण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि उत्पादन क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button