breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टसमुळे पाणी, सांडपाणी प्रक्रिया अन् पुन:वापर क्षेत्रात पिंपरी-चिंचवडचा जगभरात लौकीक!

  • क्रेडाई पुणेचे अध्यक्ष व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे यांच्या भावना

पिंपरी – पर्यावरण संवर्धनाचा वसा जोपासत पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया अन् पुन:वापर क्षेत्रात पुण्याचा लौकीक जगभरात मिळवणारी प्रथितयश डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रो. प्रा. लि. ही कंपनी पिंपरी-चिंचवडमधील आहे, याचा अभिमान वाटतो, अशा भावना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष, प्रसिद्घ बांधकाम व्यावसायिक अनिल फरांदे यांनी व्यक्त केल्या.

डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस कंपनीचा 15 वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा झाला. शहरातील एका नामांकीत हॉटेलमध्ये छोटेखानी समारंभ आयोजित केला होता.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, “क्रेडाई पुणे” चे अध्यक्ष अनिल फरांदे, पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण लडकत, कंपनीचे संचालक अशोक कुलकर्णी, विनोद भोळे, रंगनाथ रणपिसे, अरुण कुलकर्णी, मनुष्यबळ संसाधन विभागाच्या मोना पंडित आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन निवेश इव्हेंट्सचे शुभम मानमोडे व सहकाऱ्यांनी केले.

अनिल फरांदे म्हणाले की, डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टससोबत आम्ही गेल्या 8 वर्षांपासून विविध प्रकल्पांवर काम करीत आहे. व्यावसायिक तत्वनिष्ठता जोपासत कंपनीने देश-विदेशात आपली घोडदौड कायम ठेवली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडसोबत पुणे महानगर विकास प्राधिकरण अर्थात “पीएमआरडीए” मोठ्या प्रमाणात विकसित होणारा परिसर आहे. भविष्यातील पर्यावरण विषयक अडचणी ओळखून पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया व पुन: वापर क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करुन प्रोजेक्ट उभारणे अत्यावश्यक आहे. ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करणारी डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस कंपनी या क्षेत्रात लक्षवेधी कामगिरी करेल, असा आम्हाला विश्वास आहे.

सह शहर अभियंता प्रवीण लडकत म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या आता 27 लाखांच्या घरात आहे. भविष्यातील पाणी समस्या आणि उपलब्ध स्त्रोत यावर एकमेव उपाय म्हणजे सांडपाणी प्रक्रिया आणि पुन:वापर हा राहील. त्यामुळे डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस सारख्या अन्य कंपन्यांनी आपल्या कौशल्याचा वापर करुन या क्षेत्रात योगदान दिले पाहिजे.

गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान!

डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस कपंनीच्या पुढाकाराने सर्व कर्मचारी, अधिकारी यांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले. या सोबतच गेल्या दोन वर्षांत कंपनीतील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. ‘बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर’ यासह अन्य 20 विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. कंपनीच्या लेखा विभागात काम करणारे विवेक जोशी यांना ‘बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्याप्रमाणे कंपनीत सलग 5 वर्षे सेवा बजावलेल्या 25 कर्मचाऱ्यांनाही सन्मानीत करण्यात आले.

पूरग्रस्तांना मदत करीत जोपासली सामाजिक बांधिलकी!

डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्टस कंपनीने व्यावसायिक क्षेत्रात भरारी घेत असतानाच सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर कंपनीच्या पुढाकाराने 1 हजार पिण्याच्या पाण्याचे जार मदत देण्यात आली. यापूर्वी कोविड काळातील मदत, गतवर्षीच्या महापूरातील मदत, पर्यावरण पूरक वारीसाठी प्रयत्न, कुसूर, माळीण आणि मिडगुलवाडी आदी गावांमध्ये अध्ययात पाणी शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात आली आहे. ‘सीएसआर’च्या माध्यमातून कंपनीने अनेकठिकाणी समाजपयोगी उपक्रम हाती घेतले आहे. व्यावसायिक क्षेत्रात गगणभरारी घेत असतानाच कंपनीने सामाजिक बांधिलकी जपली आहे, अशी माहिती मनुष्यबळ संसाधन विभागाच्या मोना पंडित यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button