TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

प्रशासनाची सतर्कता, आगप्रवणस्थळी कर्मचाऱ्याची नियुक्ती

दुर्घटणा रोखण्यासाठी सकारात्मक पवित्रा

मोशी- मोकळ्या भुखंडावर कचरा टाकून आग लावण्याचे प्रकार मागील काही दिवसांपूर्वी मोशी प्राधिकरण परिसरात घडले आहेत. असे अनुचित प्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने सतर्कता दाखवत आगप्रवणस्थळी कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. दिवसभर महापालिकेचा कर्मचाऱी अन् रात्री आरटीओच्या कर्मचाऱ्याचीही कडक नजर असणार आहे.
मोशी प्राधिकरणात पीएमआरडीएच्या मोकळ्या भुखंडावर कचरा टाकण्यात आला होता. या कचऱ्याला रात्रीच्या वेळी कोणीतरी आग लावल्याची घटना चार दिवसांपूर्वी घटली आहे. आगीच्या ठिकाणी जवळपास पेट्रोलपंप तसेच रहिवासी परिसर असल्याने अनेकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. मोठे आगीचे लोळ आणि धूर याचा परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. असे प्रकार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने सतर्कता दाखवत कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे. तसेच रात्रीच्या वेळी अशा घटना घडू नयेत म्हणून आरटीओ तसेच परिसरातील नागरिकांची मदत घेतली जाणार आहे. तसेच मोकळ्या भूखंडावर कचरा टाकू नये यासाठी पीएमआरडीए ला निवेदन देण्यात येणार आहे. या निवेदनाद्वारे मोकळ्या भूखंडाला कंपाऊड करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती क प्रभाग आरोग्य निरीक्षक क्षितीज रोकडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button