ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अजंठानगर येथे ‘विश्वास’ रिक्षा स्टँडचे उद्घाटन

पिंपरी चिंचवड | अजंठानगर येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत संलग्न विश्वास रिक्षा स्टँडचे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे आणि स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. रिक्षावरील विश्वास अधिक घट्ट करण्यासाठी विश्वास रिक्षा स्टँड ची निर्मिती केल्याचे माजी नगरसेवक विश्वास गजरमल यांनी सांगितले.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, रावसाहेब सरवदे, ॲड. रूपवते साहेब, रमेश वाघमारे, मेजर साबळे साहेब, श्रीरंग जोगदंड, अंकुश साबळे आदी उपस्थित होते.

अजंठानगर हा परिसर झोपडपट्टी आणि नागरी स्लमवस्ती म्हणून ओळखला जातो. या भागात कामगार कष्टकरी वर्ग राहत आहे. स्वतःची वाहन व्यवस्था नसल्यामुळे रात्री-बेरात्री नागरिकांना रिक्षा मिळत नाही. रात्री-अपरात्री महिला प्रस्तुती वेळी हॉस्पिटल तसेच इतर कारणासाठी काही व्यक्ती जास्त रिक्षा भाडे घेतात. यामुळे रात्री बारा ते पहाटे चार या वेळात विश्वास रिक्षा स्टँडच्या वतीने हॉस्पिटल व इतर तातडीच्या कारणासाठी मोफत रिक्षा सेवा दिली जाणार आहे. विश्वास या नावाने रिक्षास्टँड या ठिकाणी उद्घाटन होत आहे. रिक्षाचालकवरील विश्वास अधिक घट्ट करण्यासाठी हे स्टँड काम करेल असे यावेळी माजी नगरसेवक विश्वास गजरमल म्हणाले.

बाबा कांबळे म्हणाले की, रिक्षा स्टँडवर पानपोई, वाचनालय असे समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले पाहिजेत. या रिक्षा स्टँडवर जागा उपलब्ध असल्यामुळे याठिकाणी वाचनालय आणि पाणपोई तसेच नागरिकांना बसण्यासाठी बाकडे याची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात यावी. नागरिक आणि रिक्षाचालक सुसंवाद वाढला पाहिजे. असे झाल्यास नागरिकांना अधिक चांगली प्रवासी सेवा देण्याचं काम रिक्षा चालक करू शकतात असा मला विश्वास आहे.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रिक्षा स्टँडचे अध्यक्ष राम अलकुंटे, उपाध्यक्ष विशाल सरवदे, अमर गायकवाड, दादा दाभाडे, धनंजय गवळी, उमेश गायकवाड, दिपक साबळे, बाबासाहेब सरवदे, महादेव अवसरमल यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button