Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मालवणी परिसरात एकाच दिवसात दोन जणांची हत्या; शहरात खळबळ

मुंबई | मालाडच्या अत्यंत गजबजलेल्या मालवणी परिसरात एकाच दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या करण्यात आली. पहिल्या घटनेत पतीने पत्नीची, तर दुसऱ्या घटनेत रागाने पाहतो म्हणून अल्पवयीन मुलाने तरुणाला ठार मारले. दोन्ही गुन्ह्यांत मालवणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मालवणी येथील यशोदीप सोसायटीमध्ये विजयमाला बलाडे (४५) या पती ज्ञानोबा आणि इतर सदस्यांसह वास्तव्यास होत्या. शुक्रवारी मध्यरात्री विजयमाला आणि ज्ञानोबा यांच्यामध्ये झोपण्यावरून वाद झाला. संतापाच्या भरात ज्ञानोबा यांनी घरामध्ये असलेला दगडी पाटा डोक्यात घालून विजयमाला हिची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि ज्ञानोबा यांना ताब्यात घेतले.

दुसरी घटना अंबोजवाडी परिसरात घडली. येथील तौसिफ खान हा तरुण शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातून सार्वजनिक शौचालयाच्या दिशेने जात असताना त्याच्यासमोरून एक अल्पवयीन मुलगा आला. एकमेकांकडे रागाने बघण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि रागाच्या भरात अल्पवयीन मुलाने स्वतःकडील चाकूने तौसिफला भोसकले. जखमी तौसिफला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी तौसिफ याची हत्या करणाऱ्या अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button