Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

सावधान! बूस्टर डोस मोफत मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना सायबर फसवणुकीचं शिकार बनवलं जात, मुंबई पोलिसांकडून धक्कादायक माहिती

मुंबई : ऑनलाइन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार रोज काहीना काही नवे डावपेच वापरत असतात. सध्या केंद्र सरकारने करोनाचा बूस्टर डोस मोफत देण्याची घोषणा करताच सायबर गुन्हेगारांच्या हालचाली वाढल्या आहेत. करोना बूस्टर डोस मोफत मिळवून देण्याच्या नावाखाली लोकांना सायबर फसवणुकीचं शिकार बनवलं जात आहे. सायबर सेलच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात क्रमांकांवरून बूस्टर डोसबद्दल कॉल करून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आल्याच्या तक्रारी समोर येत आहे. सगळ्यात विशेष म्हणजे १५ जुलैपासून सरकारने करोनाचा बुस्टर डोस मोफत जाहीर केला आहे. त्यानंतर या घटनांमध्ये वाढ झाल्याचं समोर येत आहे.

अशा प्रकारे होते फसवणूक…
नागरिकांनो, अशा सायबर गुन्हेगारांना बळी पडू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. फसवणूक करण्यासाठी संबंधित लोक पीडितेला फोन करतात आणि मी आरोग्य विभागातून बोलत आहे. यानंतर तो त्यांना विचारतो की तुमचे करोनाचे दोन्ही डोस (लस) घेतले आहेत का? तुम्ही ‘हो’ म्हणताच, तो अज्ञात कॉलर तुम्हाला सांगेल की, ‘सर, तुम्हाला करोनाचा बूस्टर डोस लावावा लागेल. यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागेल. मी तुमची नोंदणी करत आहे. यासाठी, तुमचा OTP (One Time Password) येताच आम्हाला कळवा.

यानंतर तुम्हाला तारीख आणि ठिकाणाची पुष्टी करण्यासाठी एसएमएस पाठवला जाईल. तो एसएमएस ओपन करून, तुम्ही बुस्टर डोसची तारीख आणि स्थान निश्चित कराल. असं बोलून ती व्यक्ती फोन डिस्कनेक्ट करते. त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून, भोळे लोक विचार न करता त्या अनोळखी व्यक्तीच्या नंबरवर मोबाईलवरचा ओटीपी पाठवतात. त्यानंतर थोड्याच वेळात, पीडितेला एक एसएमएस मिळतो की, जो बूस्टर डोससंबंधी नसून बँकेच्या खात्यातून पैसे काढल्याबद्दल असतो.

१९३० क्रमांकावर तक्रार करा

सायबर क्राइमचे डीसीपी हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईमची तक्रार नोंदवण्यासाठी १९३० हा हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे. याद्वारे लोक फसवणुकीची ऑनलाइन तक्रार दाखल करू शकतात.

या संदर्भात सायबर एक्सपर्ट, मुंबई डॉ. प्रशांत माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर बदमाश लोकांना करोनाचा बूस्टर डोस मिळवून देणं, स्वस्त दरात वस्तू देणं, महागड्या भेटवस्तू मोफत देणं, KYC अपडेट करतात, KBC मध्ये लाखोंची लॉटरी जिंकल्याचं सांगतात आणि लोकांची फसवणूक करतात. त्यांच्या जाळ्यात अडकून त्यांना ऑनलाइन फसवणुकीचा बळी बनवतात. त्यामुळे लोकांनी सायबर क्राईमची माहिती मिळवावी, जागरूक राहावे आणि खबरदारी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

फसवणुक झाल्यास ‘इथे’ कराल तक्रार…

सायबर क्राइमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही https://[email protected], https://[email protected] आणि https://cybercrime.gov.in वर मेल करू शकता. याशिवाय, तुम्ही 022-22160080 किंवा 9820810007 वर कॉल करू शकता आणि @mumbaipolice आणि @cpmumbaipolice ट्विट करून मदत मिळवू शकता.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button