breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बहिणीचा विनयभंग; सख्ख्या भावावर गुन्हा दाखल

पिंपरी |महाईन्यूज|

सख्ख्या बहिणीसोबत अश्‍लील वर्तन करून भावानेच तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बोपखेल येथे घडली. याबाबत आई-वडील व भावाने जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून बहिणीला हाताने व लाकडाने मारहाण केली. याप्रकरणी भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 17 डिसेंबरला 2020 ला बोपखेल येथील रामनगर येथे घडली.

याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पीडित बहिणीने फिर्याद दिली आहे. पीडित बहीण आई-वडिलांकडे राहत असून तिला दोन भाऊ आहेत. त्यापैकी आरोपी भाऊ आई वडिलांना नेहमी त्रास देतो. पीडित मुलगी घरात झोपलेली असताना आरोपी भाऊ तिच्याजवळ झोपला आणि तिच्याशी अश्‍लील वर्तन केले. याचा जाब आई, वडील आणि दुसऱ्या भावाने विचारला असता आरोपीने त्यांना शिवीगाळ केली. तसेच पीडित महिलेला हाताने व लाकडाने मारहाण केली. याबाबत भोसरी पोलिस तपास करीत आहेत.   

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button