पिंपरी / चिंचवड

बँकेतून बोलत असल्याचे सांगून दोन लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँकेने तुम्हाला दोन क्रेडीट कार्ड दिले आहेत. त्यातील एक बंद करा म्हणजे त्याला चार्ज लागणार नाही. असे सांगत विशाल नावाच्या व्यक्तीने एका तरुणीच्या बँक खात्यावरून दोन लाख एक हजार 996 रुपये ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली. ही घटना 18 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता कृष्णा नगर चिंचवड येथे घडली.

निखीता ज्ञानेश्वर देशमाने (वय 24, रा. कृष्णानगर, चिंचवड. मूळ रा. बुलढाणा) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 28) फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन केला. तो आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँकेने फिर्यादी यांना दोन क्रेडीट कार्ड दिले आहेत. त्यातील एक कार्ड बंद करा म्हणजे त्यावर चार्ज लागणार नाही. दुसरे सुरु ठेवा, त्यावर चार्ज लागेल असे सांगत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यांनतर फिर्यादी यांच्या दोन्ही क्रेडीट कार्ड मधून प्रत्येकी एक लाख 998 रुपये काढून एकूण दोन लाख एक हजार 996 रुपये हाऊसिंग खात्यावर ट्रान्सफर करत फिर्यादीची फसवणूक केली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button