breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

थकबाकी न भरल्यामुळे पिंपरी चिंचवड आरटीओ 12 दिवसांपासून अंधारात

पिंपरी  – तब्बल दहा महिने वीजबिल न भरल्यामुळे पिंपरी चिंचवड आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) मागील 12 दिवसांपासून अंधारात आहे. थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या महावितरण राबवत आहे. आरटीओची थकबाकी वाढल्याने कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयाने दहा महिने वीजबिल न भरल्यामुळे त्यांची थकबाकी सहा लाख 49 हजार झाली आहे. याबाबत माहिती देताना महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत म्हणाले, ‘आरटीओच्या पिंपरी चिंचवड कार्यालयाने थकबाकी भरावी म्हणून त्यांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या. त्यांच्याशी संपर्क साधून वीज पुरवठा खंडित करण्याचा इशाराही दिला होता. परंतु, त्यांच्याकडून तत्परतेने पावले उचलली गेली नाही. सलग 10 ते 12 महिने त्यांनी थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे त्यांचा वीज पुरवठा खंडित करावा लागला. पिंपरी-चिंचवड आरटीओचा वीज पुरवठा 12 दिवसांपूर्वी खंडित केला आहे. थकबाकी भरावी, म्हणून त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.’

राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यामुळे थकबाकी भरता येत नसल्याचे आरटीओचे म्हणणे आहे. दरम्यान, वीज नसल्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. आरटीओ कार्यालयात जनरेटर आहे. परंतु, त्यालाही मर्यादा असल्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button