breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाच दिवसांच्या श्री गणरायाची आराधना

पिंपरी – केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी येथे पाच दिवसांच्या पर्यावरण पूरक श्री गणरायाची भक्तिभावाने आराधना करण्यात आली. कोरोनाच्या महामारीत श्री गणराया ची कृपा व परमात्मा पांडुरंगाचे आशीर्वाद ही भक्ती शक्ती ची एकत्रित संकल्पना घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. धनंजय वर्णेकर, सचिव श्री ज्ञानेश्वर काळभोर, संचालक श्री राम रैना, संचालिका सौ.शितलताई वर्णेकर, विश्वस्त सौ.राजश्रीताई काळभोर, उपप्राचार्य सरबजीत महल यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पाच दिवसांच्या या कार्यकाळात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने गणेश मूर्ती, बनवणे चित्रकला, श्री गणेशा सजावट, विद्यार्थ्यांच्या घरची लाईव्ह आरती, अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शेवटच्या दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात शालेय विद्यार्थी परिक्षित राठोड-वायोलिन,ओम कदम- सिंथेसायझर, मृण्मयी पंगणुरवार- भरतनाट्यम, ऋजुता बोरकर कथक यांद्वारे श्रीगणेशाची आराधना केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना नृत्य सादर केले.

परमात्मा पांडुरंग व श्री गणेशाच्या चरणी कृपेची केलेली याचना श्री परिक्षित कुंभार यांनी भैरवी भजना द्वारे सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मान्यवर अतिथींच्या हस्ते पालखीतून ढोल लेझीम पथकाच्या गजरात श्री गणरायाची सवाद्य मिरवणूक काढली व भक्तिमय वातावरणात शाळेच्या प्रांगणातच तयार केलेल्या विसर्जन कुंडात श्री गणरायाची मनोभावे विसर्जन करून पुढच्या वर्षी लवकर येण्याचे अवाहन केले.

या संपूर्ण उत्सवाचे यशस्वी आयोजन व संकल्पनात्मक सजावट शाळेच्या इवेंट कमिटीने केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुरेखा आवटे व विभा दवे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button