breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निगडी उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरला भक्ती शक्ती नामकरण

पिंपरी | प्रतिनिधी

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये 20 जानेवारी 2021 रोजी ठेवण्यात आला. या प्रस्तावास निगडी येथील उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज (भक्ती शक्ती) उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. मनसेच्या वतीने वारंवार यासाठी पाठपुरावा केला होता, अशी माहिती मनसेचे गटनेते तथा नगरसेवक सचिन चिखले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराला वर्षानुवर्ष ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा आशीर्वाद लाभलेला आहे. वर्षानुवर्ष जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहू ते पंढरपूर पिंपरी-चिंचवड शहरातून प्रस्थान करत होत असतो. पिंपरी-चिंचवड शहराचे प्रवेशद्वार म्हणजेच भक्ती शक्ती चौक. या चौकांमध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती शिल्प उभारले गेले आहे. हे शिल्प पाहण्यासाठी देशभरातून हजारो पर्यटक या ठिकाणी येतात. या चौकांमध्ये वर्षानुवर्ष वाहतूक कोंडी व अपघात मोठ्या प्रमाणात होत असे. त्यामुळे या चौकामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ग्रेट सेपरेटर व उड्डाणपूल बांधण्यात आलेला आहे. या नव्याने होत असलेल्या उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज हे नामकरण व्हावे ही सर्वांची इच्छा होती.

त्यानुसार ‘फ’  प्रभागाच्या बैठकी मध्ये दिनांक  4 जून 2018 रोजी सदस्यांच्या ठरावानुसार भक्ती-शक्ती उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज भक्ती-शक्ती उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. चारही नगरसेवकांच्या वतीने हा ठराव पास करण्यात आला. यामध्ये सूचक- सचिन चिखले, उत्तम केंदळे, व अनुमोदक- सुमन पवळे व कमल घोलप यांनी सदस्य ठराव पास केला. हा सदस्य ठराव पास केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने सर्वसाधारण सभेमध्ये 20 जानेवारी 2021 रोजी ठेवण्यात आला. या प्रस्तावास निगडी येथील उड्डाणपुलास जगद्गुरु संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज  (भक्ती शक्ती) उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button