पिंपरी / चिंचवड

टपरी, किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी दोघांना अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पिंपरी l प्रतिनिधी

टपरीमध्ये आणि किराणा दुकानामध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. टपरी चालक आणि किराणा दुकान चालकाला अटक करत त्यांच्यासह चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 26) दुपारी सव्वाएक वाजता महाळुंगे परिसरात करण्यात आली.

पवनकुमार माताराज शर्मा (वय 21, रा. फडकेवाडी, चाकण. मूळ रा. मनेहु, ता. मानधाता, जि. प्रतापगड), मुलचंद पन्नालाल परमार (वय 43, रा. फडकेवस्ती, निघोजे रोड, चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अनिल मौर्या (रा. फडकेवस्ती, चाकण), अभिषेक गुप्ता (रा. चाकण) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पवनकुमार याची विकास पान टपरी नावाची टपरी आहे. त्यात आरोपीने 49 हजार 671 रुपयांचा शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला विक्री करताना आढळून आला. त्याने हा गुटखा आरोपी अभिषेक याच्याकडून आणला होता.

अभिषेक याचे जय तुळजाभवानी किराणा नावाचे दुकान आहे. त्यात पोलिसांना एक लाख 15 हजार 543 रुपयांचा गुटखा आढळला. दोन्ही ठिकाणी एकूण एक लाख 65 हजार 214 रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. दोघांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button