पिंपरी / चिंचवड

कामावर निघालेल्या दुचाकीस्वार तरुणीचा बावधन येथे अपघात : तरुणीचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

बावधन येथे एका अज्ञात वाहनाने मोपेड दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू झाला. हा अपघात 25 फेब्रुवारी रोजी सकाळी सव्वादहा वाजता शिंदे पेट्रोल पंपाजवळ बावधन येथे घडला.

सानिया अनिल जाधव (वय 24, रा. आनंदनगर, पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी सानिया यांचा चुलत भाऊ सागर सुनील जाधव (वय 36, रा. च-होली फाटा, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चुलत बहीण सानिया 25 फेब्रुवारीत रोजी सकाळी सव्वादहा वाजता मोपेड दुचाकीवरून बाणेर येथे कामावर जात होती. बावधन येथील शिंदे पेट्रोल पंपाजवळ आल्यानंतर सानिया यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरात धडक दिली. यामध्ये सानिया गंभीर जखमी झाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालक सानिया यांना उपचारासाठी रुग्णालयात न नेता तसेच अपघाताची पोलिसांना माहिती न देता निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button