breaking-newsपिंपरी / चिंचवड

चिंचवड नवरात्र महोत्सवात नागरिकांना लाभले साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

अश्विन शु. १,सायं. ४:४५ वा. या शुभ मुहूर्तावर मूर्तिकार योगेश व शितल कुंभार यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी श्री मकरंद बेलसरे यांनी पौराहित्य केले. श्री रविंद्र देव यांच्या स्वानंद धुपारती मंडळाच्या वतीने मोरया पदे व संध्याकाळी महाआरती पार पडली.

आश्विन शु. २ सकाळची आरती ओंकार योग साधक यांच्या हस्ते पार पडली. यावेळी श्री मोरया पारायण मंडळाच्या वतीने श्री मोरया चरित्र पठणाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांनी सदिच्छा भेट दिली. वृंदावन भजनी मंडळ, दशोनेमा भजनी मंडळ, स्वरदा भक्तिगीत मंडळ, मोरया महिला भजनी मंडळ, यांनी आपली भजन सेवा दुर्गामातेच्या चरणी अर्पण केली.

अश्विन शु. ३ सकाळची आरती श्री गजानन महाराज सत्संग मंडळ व उपासना योगा ग्रुपच्या हस्ते पार पडली. त्यानंतर कुमारिका पूजनाचा कार्यक्रम पार पडला. यात संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, गायत्री परिवार तसेच चिंचवड परिसरातील भजनी मंडळानी सहभाग घेतला. दहा शाळांतील ३५० विद्यार्थिनीची पाद्य पूजा करून त्यांना भेटवस्तू, प्रसाद देऊन सांगता करण्यात आली.

नवरात्रीचे महत्व, कुमारिका पूजनाचे महत्व तसेच आपली संस्कृती पुढील पिढीला माहिती व्हावी, हा छोटासा प्रयास सुरू आहे. मुली व महिलांनी हळदी-कुंकू का लावावे, त्याचे महत्व यावेळी डॉ. जगताप यांनी नमूद केले. चिंचवड नवरात्र महोत्सवाच्या अध्यक्षा अश्विनी चिंचवडे यांनी कुमारिका पूजनासाठी उपस्थित सर्वांचे  आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अजित जगताप, शोभा जोशी, गटणे, माधुरी कवी, सुभाष चव्हाण, यशवंत देशपांडे, गायत्री परिवाराचे श्री व देसले, न्यू इंग्लिश स्कूल, युनिक व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल, क्रा. चापेकर शाळा, हु. चापेकर विद्यामंदीर, केशवनगर प्राथ. शाळा, मनोरमा शाळेचे सर्व शिक्षकवृंद, अनिता कोळसुने, पुष्पा पाटील, जाधव यांनी सहकार्य केले.

अश्विन शु. ४ सकाळी फिटनेस क्लब सहकार्‍याच्या हस्ते आरती संपन्न झाली. चिंचवड नवरात्र महोत्सवाच्या वतीने लोककल्याण आरोग्य केंद्र, मुंबई यांच्या सहयोगाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नेत्र परीक्षण, चष्मा व औषध वाटप करण्यात आले. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्ञानदीप भजनी मंडळ, हरिपाठ प्रचार भजनी मंडळ, सिद्धकला भजनी मंडळ, गीताई भजनी मंडळ या मंडळानी आपली भजन सेवा दुर्गामातेच्या चरणी अर्पण केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button