breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोरोनाच्या निर्बंधांमुळे ताडी व्यावसायिक आर्थिक विवंचनेत

  • ताडी व्यावसायिकांनाही घरपोच सेवा देण्याची मुभा द्यावी

पालघर |

निर्बंधांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत ताडी उत्पादक पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. उत्पादन केलेली ताडी-माडी तशीच पडून असल्याने व्यवसाय ठप्प आहे. निर्बंधामुळे ग्राहकवर्ग नसल्याने नुकसानी होत आहे. या पाश्र्वाभूमीवर या उत्पादकांना पार्सलसेवची मुभा देण्याची मागणी जिल्ह्याच्या ताडी अनुज्ञप्तीधारक संघटनेने केली आहे. ही मागणी उत्पादन शुल्क आयुक्तांकडे केली आहे. ताडी व्यवसाय हा सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे. ताडा माडापासून ताडी काढण्याची प्रक्रिया थांबवली तर पुन्हा त्या झाडाला ताडी येण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे ताडी काढणाऱ्यांचे नुकसानच होत आहे.

दोन वर्षांपासून ताडी व्यवसाय पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या खचलेला आहे. पालघर जिल्ह्यात हजारो ताडी व्यवसायिकांमार्फत या क्षेत्रावर मोठा रोजगार दिला जातो. मात्र वारंवार आलेल्या निर्बंध यामुळे ताडी उत्पादक हवालदिल झाला आहे. पालघर, डहाणू, तलासरी आदी तालुक्यांमध्ये ताडी व्यावसायिक ताडी सहकार क्षेत्र जिवंत ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र, या सहकार क्षेत्राकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. हजारो ताडी उत्पादकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पाश्र्वाभूमीवर आता तरी विचार करून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी ताडी संघटनेमार्फत होत आहे. या काळामध्ये ताड-माड छेदण्यास प्रतिबंध करू नये, ताडी व्यावसायिकांना पार्सल देण्याची मुभा द्यावी अशी मागणी आहे.

  • गतवर्षीही फटका

गेल्या वर्षीही टाळेबंदी असल्याकारणाने परवाना शुल्क भरल्यानंतरही ताडी उत्पादकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली होती. याचा मोठा परिणाम व्यावसायिकांवर झाला होता. ताडी उत्पादन बंद करून काहींना नोकरीची वाट धरावी लागली होती. त्यानंतर आता शासनाने पुन्हा निर्बंध घातल्यामुळे व्यावसायिक हतबल झाला आहे. ताडी व्यवसायामुळे रोजगार मिळणारे मोठे सहकार क्षेत्र आजही जिवंत आहे. निर्बंधांमुळे  मोठे संकट कोसळेल. शासन प्रशासनाने विचार करून आम्हा सर्वांना दिलासा द्यावा.  – मनोज घरत, अध्यक्ष, ताडी-माडी अनुज्ञप्तीधारक संघटना

वाचा- करोनाचं विदारक वास्तव! एकाच वेळी १९ मृतदेहांवर अंत्यसंस्कार; स्मशानभूमीही पडली अपुरी!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button