breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

#Covid-19: परभणीत आणखी दोन करोना योद्धय़ांचा दुर्दैवी मृत्यू

  • आतापर्यंत सहा पोलीस कोरोनाने दगावले

परभणी |

जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील व ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस नाईक पदावरील एका ४५ वर्षीय कर्मचाऱ्याचा, तर पोलीस मुख्यालयात सहायक उपनिरीक्षक पदावर (एएसआय) कार्यरत ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचा बुधवारी सकाळी अवघ्या २ तासांच्या अंतराने कोविड केंद्रात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मूळचे कौसडी येथील रहिवासी व ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत ४५ वर्षीय पोलिस कर्मचारी हे परभणी येथील कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ दाखल झाले होते. उपचार सुरू असताना बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले.

दरम्यान, बुधवारे पहाटे पोलिस मुख्यालयात ‘एएसआय’ असलेल्या ५४ वर्षीय कर्मचाऱ्याचे करोनाने उपचारादरम्यान निधन झाले. टाळेबंदीमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांना करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. गेल्या वर्षभरापासून डॉक्टर, पोलिस आणि सफाई कर्मचारी जिवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. अशा आपत्कालीन यंत्रणांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाचा सर्वाधिक संसर्ग होत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी थेट संपर्क येत असल्याने करोनाची जास्त लागण पोलिस दलास झाली. सार्वजनिक ठिकाणी सामाजिक अंतराबाबतचे निकष पाळले जात आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी प्रामुख्याने पोलिसांवरच आहे. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत जिंतूर, पूर्णा, बामणी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ व पोलीस अधीक्षक कार्यालयातील १ अशा ४ कर्मचाऱ्यांचा आणि आज २ अशा एकूण ६ पोलिसांचा आतापर्यंत करोनाने मृत्यू झाला आहे.

वाचा- ‘प्राणवायू उपलब्ध होईल’; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा दावा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button