breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे जाहीर केलं ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा राज्यात प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आणि यातच परीक्षा, शाळा यांच वेळापत्रकच कोलमडलं आहे . वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने ऑनलाईन पद्धतीनं वर्ग घेतले जाणार असल्याचं सरकारनं यापूर्वीच जाहीर केलं होतं. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन वर्गांचे वेळापत्रक ट्विट करून जाहीर केले आहे.

वेळापत्रक

१) पूर्व प्राथमिक (बालवाडी) – सोमवार ते शुक्रवार ऑनलाईन वर्ग होणार आहे. याचा कालावधी प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचा असणार आहे. या वर्गांमध्ये पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी मार्गदर्शन केलं जाणार आहे.

२)पहिली व दुसरी – सोमवार ते शुक्रवारी या कालावधीत प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन वर्ग घेण्यात येणार आहे. यामध्ये १५ मिनिटं विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद मार्गदर्शन असणार आहे. तर उर्वरित १५ मिनिटं विद्यार्थ्यांना उपक्रमावर आधारित शिक्षण दिलं जाणार आहे.

३) तिसरी ते आठवी – या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन वर्ग घेतली जाणार आहेत. यात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण दिलं जाणार आहे.

४) नववी ते बारावी – या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ४५ मिनिटांची चार सत्रे असणार आहेत. त्यातून त्यांना ऑनलाईन माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button