breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये करदात्यांना २४ कोटींची भरघोस अशी मिळाली कर सवलत

साडेतीन लाख करदात्यांनी घेतला लाभ : सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांची माहिती

पिंपरी | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सवलतींचा शहरातील साडेतीन लाख करदात्यांनी लाभ घेतला आहे. या करदात्यांना तब्बल २४ कोटी ३२ लाख रुपयांची कर सवलत मिळाली आहे, अशी माहिती कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

शहरात निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, मोकळा जमीन, मिश्र यासह विविध अशा ६ लाख २५ हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर संकलन विभागाच्या वतीने कर वसूल करण्यात येतो. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६ लाख २५ हजार मालमत्तांपैकी ५ लाख ११ हजार १५४ मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ९७७ कोटी ५० लाख रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. गतवर्षी या विभागाने ८१६ कोटींचा कर वसूल केला होता. यंदा तब्बल १६१ कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे.

महापालिकेच्या वतीने करदात्यांना आगाऊ कर भरल्यास, ऑनलाईन आगाऊ भरणा केल्यास, महिलांच्या नावावर मालमत्ता असल्यास करात सवलत, दिव्यांग, माजी सैनिक, शैर्य पदक धारक, पर्यावरण पूरक सोसायटी, पर्यावरण पूरक खासगी शैक्षणिक संस्था अशा विविध प्रकारे करामध्ये सवलत देण्यात येते.

हेही वाचा    –    साखरेऐवजी या पदार्थांचे सेवन करा; आरोग्य राहिल निरोगी 

१६ हजार १३२ सदनिका धारकांना पर्यावरण पूरक सवलतींचा मिळाला लाभ

सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि झिरो वेस्ट प्रकल्प राबवून पर्यावरणासाठी अमूल्य योगदान देणाऱ्या शहरातील १६ हजार १३२ सदनिका धारकांना तब्बल ७१ लाख रूपयांची घसघशीत अशी मिळकत कराच्या सामान्य करातून सवलत मिळाली आहे.

असा घेतला लाभ

रोख अथवा धनादेशाद्वारे आगाऊ कर भरणा करणाऱ्या ८६ हजार २५२ मालमत्ता धारकांना ३ कोटी ४५ लाख, ऑनलाईन आगाऊ कर भर भरणा करणाऱ्या २ लाख ४५ हजार २५३ जणांना सर्वाधिक १५ कोटी ६२ लाख, मालमत्ता महिलांच्या नावावर असल्यामुळे १२ हजार ५५९ महिलांना २ कोटी १४ लाख, १२५७ दिव्यांगांना ३ लाख, ३ हजार ४५२ माजी सैनिकांना २ कोटी ८ लाख रुपयांची भरघोस अशी करातून सवलत मिळाली आहे.

करदात्या नागरिकांना करांमध्ये विविध सवलती देण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्रेसर आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी कर भरण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२४ पर्यंत आहे. गत वर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी आपल्या कराचा भरणा करून संबंधित लागू असलेल्या सवलतींचा लाभ घ्यावा.

– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button