breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

काँग्रेस नेते अशोक चव्हाण भाजपात जाणार? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत

मुंबई : महाविकास आघाडीची काल छत्रपती संभाजीनगरमध्ये वज्रमूठ सभा झाली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, शिंदे गटातील नेत्याने काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात जातील असा मोठा दावा केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, ही वज्रमूठ नव्हती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंची मजा घेण्यासाठी मंचावर बसले होते. हे कधीही एक होणार नाहीत. त्या सभेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आले नाहीत. ते एवढे आजारी होते का की, सभेला आले नाहीत. आज तेच नाना पटोले सुरतला कोर्टात चालले आहेत.

काँग्रेसमध्ये एकवाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांचंही जमत नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की, अनेक दिवसांच्या घडामोडीवरून अशोक चव्हाण लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपात जातील. कारण एवढ्या मोठ्या नेत्याला तिथं योग्य वागणूक मिळत नाही, असं एकंदर दिसत आहे, असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे.

बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत

अशोक चव्हाण भाजपात जातील असेच प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अनेक घडामोडी घडल्या आहेत. बाळासाहेब थोरात भाजपात जाणार नाहीत, कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचं विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले तर बाळासाहेब थोरात भाजपात जातील. असं त्याचं उलटं पालटं गणित आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत साशंकता आहे. असं असलं तरी अशोक चव्हाण यांची मानसिकता झाली असावी. ते निश्चितपणे भाजपात प्रवेश करतील, असंही शिरसाट म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button