पिंपरी / चिंचवड

निगडी, दिघी, मोशीत चोरीच्या तीन घटना : मोबाईल, कार, लॅपटॉप चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

निगडी, दिघी आणि मोशी येथे चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. फोनवर बोलत जात असलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावला. दिघी परिसरातून एक कार चोरीला गेली. तर मोशी येथील किसान कृषी प्रदर्शनातून एक लॅपटॉप आणि एअरपॉड चोरीला गेला आहे. याप्रकरणी निगडी, दिघी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आम्रपाली दादासाहेब धावारे (वय 38, रा. अजंठानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार तीन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या सोमवारी (दि. 28) दुपारी अडीच वाजता अजंठानगर, येथून मोबाईल फोनवर बोलत रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी महिलेच्या हातातील मोयाबिल फोन हिसकावून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

कल्याण अर्जुन डिसले (वय 39, रा. आळंदी देवाची, ता. हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार (एम एच 14 / बी ए 5819) घराजवळ पार्क केली. रविवारी (दि. 27) दुपारी बारा ते सोमवारी (दि. 28) दुपारी साडेतीन वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांची कार चोरून नेली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

शिवीत रवींद्रकुमार वोरा (वय 31, रा. पंजाब) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांनी मोशी येथील कृषी प्रदर्शनात करतार ट्रॅक्टर स्टॉल लावला होता. स्टॉलच्या टेबलवर ठेवलेला 70 हजारांचा लॅपटॉप आणि 15 हजारांचा एअरपॉड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button