breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राज्याच्या दोन मंत्र्यांनी दाखविल्या तलवारी; वर्षा गायकवाड व अस्लम शेख यांच्यावर गुन्हा

मुंबई |

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात तलवारी दाखविल्याने महाराष्ट्र आघाडी सरकारमधील दोन मंत्री अडचणीत सापडले आहेत. शस्त्रबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख; तसेच काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांच्याविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शनिवारी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंचावर काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इम्रान प्रतापगढी, वर्षा गायकवाड, अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. इम्रान यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या तलवारी मंचावरील मान्यवरांनी उंचावून दाखवल्या.

जाहीर कार्यक्रमामध्ये शस्त्रांचे प्रदर्शन म्हणजे शस्त्रबंदीचे उल्लंघन असल्याने वांद्रे पोलिसांनी या कृत्याची गंभीर दखल घेऊन गायकवाड, शेख आणि इम्रान यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला. काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपचे मोहीम कंबोज यांनी तलवार दाखवून आनंद साजरा केला होता. त्या वेळेस त्यांच्यावरही सांताक्रूझ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button