breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खेळ रंगला पैठणीचा तरूणांसह वयोवृद्धांनी लुटला आनंद

आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष मित्र मंडळाचे आयोजन

पिंपरी : मोशी येथे न्यू होम मिनिस्टर प्रस्तुत क्रांती नाना मळेगावकर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम राबवण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संघर्ष मित्र मंडळ मोशी गावठाणच्या वतीने मोरया चौक आदर्श नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वयोवृद्ध महिलांनी आकर्षक खेळ करून उपस्थितांचे डोळे दीपवले.

संघर्ष मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चेतन माने, उपसंस्थापक अध्यक्ष तुषार गव्हाळे, अध्यक्ष सुरज गडसिंग, उपाध्यक्ष विक्रम कदम आर्दीनी कार्यक्रमाचे आयोजन केले. उद्योजक कार्तिक लांडगे, अनिल लांडगे, सुवर्णा बुर्डे, चंद्रकांत तापकीर, निकिता गोसावी आदी मान्यवरांनीया कार्यक्रमाला भेट दिली.

हेही वाचा – ‘जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत’; अजित पवार गटातील नेत्याची खोचक टीका

या मध्ये दोन हजार पेक्षा अधिक महिलांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या स्पर्धकाला आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली. त्यामध्ये पहिला क्रमांक येणार्‍या स्पर्धकाला फ्रिज बक्षीस देण्यात आला. दुसरे बक्षीस प्राप्त विजेत्याला एलईडी टीव्ही प्रदान करण्यात आली. तर तीसरे बक्षिस ओव्हन, चौथे बक्षीस मिक्सर आणि पाचवे बक्षीस इस्त्री ठेवण्यात आली होती. या बरोबरच महिलांसाठी आकर्षक बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यामध्ये सोन्याच्या तीन नथ, 47 साड्या, मानाची एक पैठणी व इतर बक्षीसे होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button