breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत’; अजित पवार गटातील नेत्याची खोचक टीका

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात पोटावरून वार-पलटवार होत आहेत. अजितदादा, त्यादिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला, तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अॅब्ज’ केले असतील. पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. आव्हाडांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सूरज चव्हाण म्हणाले, जितेंद्र अव्हाड हे राजकारणातील राखी सावंत आहेत. मी त्यांना राखी सावंत का म्हणतोय? कारण ती चित्रपटसृष्टीत असली तरी वादंग निर्माण करून प्रसिद्धझोतात येण्याचा तिचा नेहमीच प्रयत्न असतो. तसेच जितेंद्र आव्हाड आहेत. नेहमीच प्रसिद्धीझोतात येण्यासाठी काहीतरी वादंग निर्माण करणं आणि त्यातून प्रसिद्धी मिळवणं हा त्यांचा व्यवसाय आहे.

हेही वाचा  –  नवाब मलिकांवरून अंबादास दानवे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये खडाजंगी

जितेंद्र आव्हाड कधीही सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलत नाहीत. ते कधीही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलत नाहीत. ते कधीही देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात बोलत नाहीत. ते फक्त विचारधारेच्या गोष्टी करतात. विचारधारेच्या गोष्टी करून ते भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याच्या पत्रावर सहीही करतात आणि संधी बघून ते विरोधही करतात, असे जितेंद्र आव्हाड आहेत, असंही सूरज चव्हाण म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button