breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

U19 Asia Cup 2023 : या दिवशी रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना!

IND vs PAK : ८ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या ACC U-१९ आशिया चषक २०२३ चे यजमानपदासाठी आशियाई क्रिकेट परिषद सज्ज आहे. स्पर्धेचे सर्व सामने दुबईतील तीन ठिकाणी खेळवले जाणार आहे. ACC (आशियाई क्रिकेट परिषद) पुरुषांच्या अंडर-१९ आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी भारताचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे. तर भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान रविवारी १० डिसेंबर रोजी आमनेसामने येणार आहेत.

भारतीय संघाने ८ वेळा जिंकले विजेतेपद

भारतीय संघाने गेल्या वेळी म्हणजेच २०२१ मध्ये या स्पर्धेवर कब्जा केला होता. टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. भारताने विक्रमी ८ वेळा विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेने यश धुल, राज बावा आणि राजवर्धन हेंगारकर सारखे खेळाडू तयार केले आहेत जे सध्या आयपीएलमध्ये खेळत आहेत. भारताने पहिले विजेतेपद १९८९ मध्ये जिंकले होते. २००३ मध्ये पाकिस्तानने एकदा ही ट्रॉफी ताब्यात घेतली होती.

अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेसाठी भारताचा संघ : 

अर्शीन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेली अवनीश राव (यष्टीरक्षक), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उपकर्णधार). धनुष गौडा, आराध्या शुक्ला, नमन तिवारी, राज लिंबानी.

हेही वाचा  –  ‘जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत’; अजित पवार गटातील नेत्याची खोचक टीका

अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ :

मिर्झा साद बेग (कर्णधार), अहमद हुसेन, अली असफंद, अमीर हसन, अराफत अहमद मिन्हास, अजान अवेस, खुबैब खलील, नजाब खान, नावेद अहमद खान, उबेद शाह, मुहम्मद रियाज उल्लाह, मुहम्मद तय्यब, मुहम्मद जीशान, शाहजेब खान, शमील हुसेन.

सामन्यांचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोठे पाहू शकता?

ACC अंडर-१९ पुरुष आशिया चषक २०२३ चे सामने ACC YouTube चॅनेल Asian Cricket Council TV वर विनामूल्य स्ट्रीम केले जातील. कारण या मालिकेसाठी कोणतेही थेट प्रक्षेपण उपलब्ध नाही.

सामने किती वाजता सुरू होतील?

भारतीय वेळेनुसार हे सामने सकाळी ११ वाजता सुरु होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button