breaking-newsराष्ट्रिय
कॉंग्रेस कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक
नवी दिल्ली – काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याची मागणी होत असताना आज सकाळी 11 वाजता
कॉंग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे.
कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी याच महिन्यात आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. गेल्या वर्षी राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर सोनियाजींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. त्यामुळे आज होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीत नेतृत्त्व बदल आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या एका गटाला राहुल गांधींनीच पक्षनेतृत्त्व स्वीकारावे, असे वाटत आहे. त्यांना पुन्हा एकदा संधी द्यायला हवी, असेही काहींचे म्हणणे आहे.