breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारणराष्ट्रिय

आत्तापर्यंत २००० च्या ‘इतक्या’ नोटा जमा झाल्या, सरकारची संसदेत माहीती

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रूपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेतला. २००० च्या नोटा वितरणातून बाहेर काढण्यात आल्या. ३० सप्टेंबरपर्यंत कोणताही नागरिक बँकांमध्ये जाऊन या नोटा बदलून घेऊ शकतो. मात्र आत्तापर्यंत २००० च्या किती नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत, याबाबतची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दिली.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आरबीआय कायदा १९३४ च्या कलम २४(१) अन्वये १० नोव्हेंबर २०१६ ला २००० रूपये मूल्याच्या चलनी नोटा व्यवहारात आणल्या होत्या. तेव्हा १००० आणि ५०० रूपये मूल्याच्या चलनी नोटा वितरणातून बाद केल्यामुळे चलनाची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे त्या परिस्थितीवर त्वरित उपाययोजना म्हणून २००० रूपयांची नोट व्यवहारात आणली गेली. केंद्रीय अर्थ आणि राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

हेही वाचा – राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा

आरबीआयच्या अहवालानुसार, २००० रूपयांच्या एकूण ७६ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. १९ मे रोजी देशात २००० रूपयांच्या एकूण ३.५६ लाख कोटी रूपयांच्या नोटा चलनात होत्या, ज्या ३० जूनपर्यंत ८४,००० कोटी रूपयांवर आल्या आहेत. म्हणजेच २.७२ ट्रिलियन रूपये किमतीच्या २००० रूपयांच्या नोटा बँकिंग प्रणालीत परत आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button