पिंपरी / चिंचवड

कोयता न दिल्याने मटण शॉपमधील कामगारावर कोयत्याने वार

पिंपरी l प्रतिनिधी

मटण शॉपमध्ये काम करणा-या कामगाराने एका व्यक्तीला कोयता दिला नाही. त्यावरून व्यक्तीने मटण शॉपमध्ये घुसून कामगार तरुणाला मारहाण केली. तसेच कोयत्याने वार करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. 15) सकाळी साडेसात वाजता दापोडी भाजी मंडई येथे घडली.

तालिब इंद्रीश कुरेशी (वय 24, रा. भाजी मंडई, दापोडी) असे जखमी कामगाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित कांबळे (वय 30, रा. दापोडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दापोडी येथील भाजी मंडई मधील पुना मटण शॉप या दुकानात काम करत आहेत. मंगळवारी सकाळी ते दुकानात काम करत असताना आरोपीने त्यांच्याकडे कोयता मागितला. फिर्यादी यांनी कोयता दिला नाही. म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्या शॉपमध्ये घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुकानातील कोयत्याने मारून फिर्यादीस जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button