breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बसपा बालाजीनगर शाखेतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

पिंपरी | प्रतिनिधी

बसपा बालाजीनगर भोसरी शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं. बालाजीनगर भोसरी येथिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्धभवन या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी उपस्थित स्थानिक महिलांच्या हस्ते सावित्रीमाई फुलेंना पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी बहुजन समाज पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुरज गायकवाड, सुशील गवळी यांनी उपस्थितांना सावित्रीमाई यांच्या कार्याची माहिती दिली.

या कार्यक्रमाला गौतम गायकवाड, धम्मदिप लगाडे, चंद्रकांत सोनवणे, लहू साळुंखे, केशव शिंदे, तेजस चंदनशिवे, घनश्याम धनवे, कुलदीप लगाडे, महिला कार्यकर्ते सविता लगाडे, सत्वशीला काळे, छाया धरवे, संगीता कसबे, कलावती मस्के, सोनाली गायकवाड, पार्वती जावळे, सखु जावळे,  कमल गायकवाड, अंतिका वाघमारे, सुरेखा बनसोडे, पायल धनवे आदी स्थानिक बालाजी नगर शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बसपा पिंपरी क्षेत्राचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी केले. आभार धम्मदिप लगाडे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button