पिंपरी / चिंचवड

जमिनीच्या कारणावरून भावकीत वाद; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

जमिनीच्या कारणावरून भावकीतील दोन गटात वाद झाला. दगड, कु-हाड आणि लाकडी काठीने मारून एकमेकांना जखमी केले. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना मंगळवारी (दि 15) कोयाळी गावात घडली.

संभाजी रावसाहेब कोळेकर (वय 32, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गंगाराम सीताराम कोळेकर (वय 68), दगडू गंगाराम कोळेकर (वय 40), अशोक गंगाराम कोळेकर (वय 37) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद झाला. फिर्यादी, त्यांचे वडील यांना आरोपींनी दगड, कु-हाडी आणि लाकडी काठीने मारून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात अशोक गंगाराम कोळेकर (वय 37, रा. कोयाळी, ता. खेड) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार संभाजी रावसाहेब कोळेकर (वय 32), रावसाहेब सीताराम कोळेकर (वय 62), लक्ष्मी रावसाहेब कोळेकर (वय 58), शीतल संभाजी कोळेकर (वय 28) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने घरामागे फिर्यादी यांचे जाण्याच्या रस्त्यावर दगड टाकले. याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता आरोपींनी फिर्यादी, त्यांच्या भावाला लाकडी काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केले. तसेच शिवीगाळ करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button