पिंपरी / चिंचवड

बहिणीच्या लग्न समारंभातून महिलेची पर्स पळवली

पिंपरी l प्रतिनिधी

लहान बहिणीच्या लग्नसमारंभात आलेल्या महिलेची दोन लाख रुपयांचा ऐवज असलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना काळेवाडी येथील रागा पॅलेस हॉल येथे मंगळवारी (दि. 19) रात्री घडली.

आरती दिनेश मोटवानी (वय 28, रा. साई चौक, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आरती यांच्या लहान बहिणीच्या लग्नसमारंभासाठी सर्व कुटुंब काळेवाडी येथील रागा पॅलेस हॉल येथे आले होत. फिर्यादी आरती काही वेळासाठी पर्स खुर्चीवर ठेवून तांदूळ आणण्यासाठी आत गेल्या. या कालावधीमध्ये अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण दोन लाख 9 हजार रुपये किमतीचा ऐवज होता. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button