ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे आमदार महेश लांडगे यांची ‘फराळ सेवा’

प्रतिवर्षीप्रमाणे भाविकांसाठी प्रसाद वाटप उपक्रम

श्रावण सोमवारनिमित्त सुमारे १० हजार भाविकांना लाभ

पिंपरी । प्रतिनिधी

श्रावण सोमवार निमित्त श्रीक्षेत्र भिमाशंकर येथे भाविकांसाठी उपवास फराळ आणि महाप्रसाद सेवा सुरू आहे. यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचा सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला.

देशभरात पवित्र १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमीनिमित्त मोठी गर्दी आहे. प्रतिवर्षी आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने श्रावणातील प्रत्येक सोमवारी प्रसाद वाटप आणि फराळ मोफत दिला जातो. राज्यातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येत असतात.

हेही वाचा – Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, ‘या’ दोन खोळाडूंचे संघात पुनरागमन

भारतीय जनता पार्टी आमदार प्रवास योजना अंतर्गत आमदार महेश लांडगे सध्या मध्यप्रदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे श्रावणातील पहिला सोमवार श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. मात्र, प्रतिवर्षीप्रमाणे मंदिर परिसरात लांडगे यांच्या पुढाकाराने मोफत फराळ वाटप सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सोमवारी पहाटे ४ वाजलेपासूनच भाविकांना फराळ सेवा सुरू असून दिवसभरात हजारो भाविक याचा लाभ घेणार आहेत. मंदिर प्रशासनानेही या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

श्रीक्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी मला कायम आत्मिक समाधान मिळते. त्यामुळे या पवित्र ठिकाणी मी कायम नतमस्तक होत असतो. पिंपरी-चिंचवडकरांसह तमाम मानवजातीला सुख-शांती लाभो, अशी प्रर्थना श्रावण सोमवारनिमित्त भगवान भीमाशंकर यांच्या चरणी करीत आहे. मोफत फराळ हा उपक्रम आम्ही प्रतिवर्षी राबवतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. त्यांना चांगला आहार, प्रसाद मिळावा, अशी आमची भूमिका आहे.

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button