पिंपरी / चिंचवडपुणे

बंजी जम्पिंग करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जम्पिंग साईटवर अपघात : उपचारादरम्यान मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

बंजी जम्पिंग करण्यासाठी कुसगाव पवन मावळ येथील इंडिया बंजी जम्पिंग ऍडव्हेंचर फोर्ट येथे गेलेल्या तरुणाचा जम्पिंग साईटवर लिफ्टमधून जाताना अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 15 एप्रिल रोजी दुपारी घडली.

याप्रकरणी इंडिया बंजी जम्पिंग ऍडव्हेंचर फोर्ट कुसगाव पवन मावळचे चालक व मालक यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक सखाराम साळवे (वय 47, रा. साकोरी, ता. जुन्नर) यांनी बुधवारी (दि. 20) शिरगाव चौकीत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा प्रवीण दीपक साळवे (वय 25, रा. हडपसर, पुणे. मूळ रा. साकोरी, ता. जुन्नर) याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा प्रवीण हा पवन मावळ कुसगाव येथील येथील इंडिया बंजी जम्पिंग ऍडव्हेंचर फोर्ट येथे बंजी जम्पिंगसाठी गेला होता. लिफ्ट मधून वर जाताना लिफ्टच्या वरील बाजूला कोणत्याही प्रकारची सुरक्षा जाळी नव्हती. त्यामुळे प्रवीणचा उजवा हात लिफ्ट व शिडीच्या मध्ये अडकून प्रवीणचा गंभीर अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या प्रवीणला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. लिफ्ट वरील बाजूला उघडी ठेवल्यामुळे, सुरक्षा नसल्यामुळे तसेच लिफ्टमन न ठेवल्यामुळे हा अपघत झाला असल्याने याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button