पिंपरी / चिंचवड
हॉटेल समोर पार्क केली दुचाकी चोरीला
पिंपरी l प्रतिनिधी
हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 19) पहाटे पिंपरी मधील मालाश्री हॉटेल समोर घडली.
द्वारकेश मनसुखलाल जैन (वय 26, रा. शिवसाई निवास, संजय वाचनालयाजवळ, पिंपरी) यांनी बुधवारी (दि.20) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास फिर्यादी जैन यांनी आपली 70 हजार रुपये किमतीची दुचाकी पिंपरीतील मालाश्री हॉटेल समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.