breaking-newsपिंपरी / चिंचवड

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षाविरोधात न्यायालयाचा मनाई आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ, काळेवाडी पिंपरी पुणे या संस्थेच्या मालमत्तेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये असा मनाई आदेश धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग, पुणे यानी दिलेला आहे. तरी, संस्थेचे अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर यांनी संस्थेचे बनावट लेटर पॅड वापरून चुकीचे कामकाज सुरू केल्याचा आरोप संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर यांनी केला आहे. 

शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ९/६/२०१९ रोजी संपन्न झाली. वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन संचालक मंडळ निवडले आहे. संस्थेचे अध्यक्ष म्हणून चंद्रकात तापकीर, सचिवपदी मल्हारी तापकीर व इतर पदाधिकारी यांची कार्यकारिणी निवड करण्यात आलेली आहे. संस्थेच्या वतीने भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदिर, लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय, एल.बी.टी. इंग्लिश मेडियम स्कूल, तापकीरनगर काळेवाडी, पुणे व श्री भैरवनाथ माध्यामिक विद्यालय, मु.पो.ओझर्डे.ता.मावळ जि.पुणे ह्या शाळा चालविण्यात येतात.

परंतु, संस्थेचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र तापकीर हे नवीन संचालक मंडळाला कामकाजात अडथळे आणण्याचा व संस्थेच्या मालमत्तेला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे संस्थेचे सचिव मल्हारी तापकीर, संचालक शशिकांत तापकीर व महेंद्र बामगुडे यांनी मच्छिंद्र तापकीर यांना ४१ ई कलमानुसार मनाई करावी, असा विनंती अर्ज न्यायालयात दाखल केला. सदर प्रकरणात न्यायालयाने दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून १५/९/२०२० रोजी मल्हारी तापकीर यांचा अर्ज मंजूर करून मच्छिंद्र तापकीर यांना मनाई केलेली आहे.

संस्थेच्या कामकाजाबाबत नियमानुसार बदल अहवाल न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. कोणताही हक्क अथवा अधिकार नसताना संस्थेच्या बनावट लेटरपॅडवर मच्छिंद्र तापकीर हे पत्र व्यवहार करीत आहेत. याबाबत सक्षम प्राधिकारी यांच्याकडे संस्थेने तक्रारी दाखल केल्याचे सचिव मल्हारी तापकीर यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button