पिंपरी / चिंचवड

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांवर भरघोस परतावा देण्याचे आमिष

– तरुणाची 53 लाखांची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी मधील शेअर मार्केट घोटाळा राज्यभर गाजत असताना पिंपरी चिंचवडमध्ये असायचे की घोटाळा समोर आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवलेल्या पैशांवर 15 दिवस ते एका महिन्यात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या 10 ते 20 टक्के परतावा अथवा दामदुप्पट करून देतो असे आमिष दाखवून तरुणाची तब्बल 53 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार 1 एप्रिल 2019 ते 4 नोव्हेंबर 2019 या कालावधीत घडला आहे.

मेघनसिंह अमरसिंह पाटील (वय 27, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 15) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमेघ जोशी (रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर, जि. सांगली), त्याची पत्नी (रा चापेकर चौकाजवळ, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास त्या पैशांवर 15 दिवस ते एक महिना या मुदतीत 10 ते 20 टक्के परतावा देतो अथवा गुंतवणूक केलेले पैसे दामदुप्पट करून देतो, असे आमिष दाखवले. त्याआधारे फिर्यादीचा आरोपींनी विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून 53 लाख नऊ हजार 994 रुपये घेऊन त्या पैशांचा मोबदला ठराविक दिवसात दिला नाही. तसेच दामदुप्पट रक्कमही दिली नाही. फिर्यादी यांच्या नावावर एकही शेअर खरेदी केला नाही. आरोपी पैसे देतील असा विश्वास असल्याने फिर्यादी यांनी दोन वर्षे वाट पाहिली. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button