breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयपीएलमध्ये चेन्नई संघात ऋतुराज गायकवाड यशस्वी कामगिरी, महापाैरांकडून काैतूक

पिंपरी |महाईन्यूज|

आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून यशस्वी खेळ करुन आपली वेगळी छाप पाडणारा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवीचा रहिवासी आहे. त्याने आयनीएलमध्ये तीन अर्धशतक झळकावत केलेल्या यशस्वी खेळाने क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले आहे. ऋतुराज हा आपल्या शहरातील रहिवासी असल्याने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी ऋतुराजच्या पालकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.

आयपीएल सामन्यामध्ये 23 वर्षीय ऋतुराजने सलग तीन सामन्यांत अर्धशतक झळकावले. आपली वेगळी छाप त्याने आयपीएलमध्ये पाडली आहे. चांगली कामगिरी केल्याने सचिन तेंडुलकर, चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनीही त्याचे कौतुक केले.

आयपीएलमधील त्याचा खेळ पाहून महापौरांनी त्याच्या पालकांना सदिच्छा भेट दिली. यावेळी महापौर ढोरे यांनी ऋतुराजचे वडील दशरथ गायकवाड आणि आई सविता गायकवाड यांची भेट घेत ऋतुराजचे कौतुक केल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महापौरांसोबत नगरसेविका शारदा सोनावणे, संतोष ढोरे, धनंजय ढोरे, हिरेण सोनवणे, भुषण शिंदे, जवाहर ढोरे, ओंकार स्वामी, यतीन शिंदे, अजय यादव आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button