ताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘हा’ शेअर बाजाराच्या घसरणीतही 150 टक्क्यांनी वधारला

Tine Agro चा स्टॉक हा एक असा स्टॉक आहे, ज्याने शेअर बाजारातील घसरणीदरम्यान शेअरधारकांना श्रीमंत केले आहे. हा टेक्सटाईल क्षेत्रातील स्टॉक असून 2022 मध्ये आतापर्यंत 7.14 रुपयांवरून 56.05 रुपयांपर्यंत वाढला आहे.

मागील एका आठवड्यात, या मल्टीबॅगर स्टॉकने पाचही ट्रेडिंग सत्रांमध्ये अप्पर सर्किटला धडक दिली. शेअरने 5 ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या भागधारकांना 21.5 टक्के परतावा दिला. गेल्या एका महिन्यात हा मल्टीबॅगर स्टॉक 22.65 रुपयांवरून 56.05 रुपयांपर्यंत वाढला. या स्टॉकने 1 महिन्यात 150 टक्के परतावा दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, 2022 मध्ये आतापर्यंत या स्टॉकने 685 टक्के परतावा दिला आहे. तर दुसरीकडे, याच कालावधीत सेन्सेक्स सुमारे 9 टक्के आणि निफ्टी सुमारे 10 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, या मल्टीबॅगर टेक्सटाईल स्टॉकची सध्याची मार्केट कॅप 31 कोटी रुपये असून हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक 56.05 च्या आतापर्यंतच्या उच्चांकावर ट्रेड करत आहे, तर बीएसईवर त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 3.90 रुपयांवर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button