ताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘झुंड’ स्थगितीची मागणी करणाऱ्या निर्मात्याला १० लाखांचा दंड

हैदराबाद | नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. अशातच हैदराबाद येथील एका चित्रपट निर्मात्याने या चित्रपटाला स्थगिती देण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यावर आता न्यायालयाने या निर्मात्याला तब्बल १० लाखांचा दंड ठोठावला आहे.

हैदराबादमधील चित्रपट निर्माते नंदी चिन्नी कुमार यांनी झुंडविरोधात याचिका दाखल केली होती. कुमार यांनी फुटबॉलपटू अखिलेश पॉलच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे मालकी हक्क खरेदी केले होते. मात्र २०१८ साली त्यांना असे समजले की, अखिलेश पॉलच्या टीमला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक विजय बारसे यांच्यावर एक चित्रपट येत आहे. त्यावेळी त्यांनी यासाठी न्यायालयात धाव घेतली कारण या चित्रपटात अखिलेश पॉलच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी दाखवल्या जातील असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर न्यायालयाने १७ डिसेंबर २०२० रोजी कुमार यांच्या बाजूने निकाल दिला होता. ज्यामुळे झुंड चित्रपटावर बंदी घातली गेली होती. त्यानंतर झुंड चित्रपटाचे निर्माते आणि नंदी चिन्नी कुमार यांच्यात काही बोलणी झाली आणि त्यांनी कुमार यांच्या अटी मान्य केल्यानंतर कुमार यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली आणि न्यायालयाकडे या चित्रपटावरील बंदी उठवण्यात यावी अशी याचिका दाखल केली. मात्र हे संपूर्ण प्रकरण संपेपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु त्याआधीच हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने न्यायालयाने कुमार यांची याचिका अमान्य करून न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप केल्याप्रकरणी त्यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणी सुनावणी करताना तेलंगणा उच्च न्यायालयाने निर्माते नंदी चिन्नी कुमार यांना दंड स्वरूपातील १० लाख रुपयांची रक्कम एका महिन्याच्या आत पंतप्रधानांच्या कोविड-19 रिलीफ फंडात भरण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याने रक्कम वेळेत न भरल्यास जिल्हाधिकार्‍यांनी ३० दिवसांच्या आत महसूल वसुली कायद्यांतर्गत ती वसूल करून पीएम फंडात पाठवावी, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button