breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणखी एक मोठी जबाबदारी

मुंबई – भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित असलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीची सर्वसाधारण सभा आज मुंबई येथे पार पडली आणि त्यात ही निवड करण्यात आली. आतापर्यंत अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी 1982 पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.या आमसभेत उपाध्यक्षपदी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची, तर सचिवपदी भाई गिरकर यांची निवड करण्यात आली. कोषाध्यक्ष म्हणून अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली. आजच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची अध्यक्षपदी, राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांची उपाध्यक्षपदी, भाई गिरकर यांची सचिवपदी, तर अरविंद रेगे यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी या संस्थेद्वारे अनेकवेळा भाजप कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्गाचे आयोजनही करण्यात येत असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button