breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

डॉन अरुण गवळीच्या दगडी चाळीचं रुप बदलणार; 40 मजली टॉवर होणार

मुंबई – डॉन अरुण गवळी याची ओळख असलेली मुंबईतील दगडी चाळ आता लवकरच जमीनदोस्त होणार आहे. म्हाडामार्फत या चाळीच्या पुर्नविकास करण्यात येणार असून याठिकाणी आता 40 मजली टॉवर उभारला जाणार आहे. याबाबत माहिती म्हाडाचे मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्विकास मंडळ अध्यक्ष विनोद घोसाळकर यांनी दिली. यात दगडी चाळीतील 10 इमारतींचा समावेश आहे.

दगडी चाळ मुंबईतील भायखळा येथील उभे असलेले अंडरवर्ल्ड डॅान अरुण गवळीचे साम्राज्य. जिथे 1970-80च्या दशकात जवळपासच्या परिसराच्या कारखान्यांमध्ये काम करणारे कामगार राहायचे. परंतु त्यानंतर मात्र ते माफिया गुंड अरुण गवळीचे बंगल्याचे स्थान आहे. गेल्या अनेक वर्षात या चाळीतील नवरात्रौत्सवातील देवीही अनेक मुंबईकरांना परिचित आहे.

दरम्यान, दगडी चाळीत एकूण 10 इमारती आहेत, ज्यापैकी दोन इमारतींमध्ये अरुण गवळीचे गीताई म्हणून घर आहे. तर इतर इमारती या रहिवाशी चाळी आहेत. या दहा इमारती 2000 साली अरुण गवळी चाळीचे मूळ मालक यांनी एका मुस्लीम व्यवसायिकाकडून अंदाजे 2 कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्या. 1980-90च्या दशकामध्ये अरुण गवळीने याच दगडी चाळीतन आपली गवळी गँग चालवली.

Sharing is caring!

Facebook
Pinterest
Twitter
Google+
No related posts.

Tags: Dagadi Chawl,mumbai

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button