TOP Newsविदर्भ

शिंदे गटाच्या शिवसेनेला नागपूरमध्ये पदाधिकारी सापडेना, केवळ तीनच नियुक्त्या

नागपूर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, त्यांना जिल्ह्यात पदाधिकारी सापडत नसून फक्त तिघांनाच नियुक्त्या दिल्यावरून उघडकीस आले आहे. चौथा पदाधिकारीसुद्धा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे. अशा कार्यकारिणीने शिवसेनेची कोणतीही हानी होणार नाही. कारण जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक एकजुटीने आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू हरणे यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिली.

खासदार कृपाल तुमाने यांनी पत्रकार परिषद आयोजित करून नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी जाहीर करण्याची घोषणा केली. आमच्याकडे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, बुथ प्रमुखपर्यंत बांधणी असल्याचे जाहीर केले. परंतु, प्रत्यक्षात १ उपजिल्हाप्रमुख, १ तालुकाप्रमुख, १ विधानसभा संघटक असे ३ पदाधिकारी जाहीर केले. तेसुद्धा किरण पांडव यांच्यासोबत गेलेले आहेत. ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे.अशा कार्यकारिणीने शिवसेनेचे नुकसान होणार नाही. ८ वर्षे ज्या जिल्ह्याचे खासदार होते त्या जिल्ह्यातील एकही शिवसैनिक खासदारासोबत नाही. म्हणून जिल्ह्याची संपूर्ण कार्यकारिणी ज्यांना जाहीर करता आली नाही, ते बुथ प्रमुखपर्यंत बांधणी असल्याचा पोकळ दावा करीत आहे. जिल्ह्यात एकही शिवसैनिक त्यांच्यासोबत नाही. त्यांची दयनीय स्थिती जिल्ह्यामध्ये असताना नवरात्रीमध्ये मोठा बॉम्ब फोडण्याची पोकळ घोषणा त्यांनी केली. बॉम्ब २०२४ मध्ये फुटणार आहे. आपली खासदारकीसुद्धा संपुष्टात येणार आहे. त्यांना पुढची पत्रकार परिषद माजी खासदार म्हणून घ्यावी लागणार आहे, असाही दावा राजू हरणे यांनी पत्रकाच्या माध्यमातून केला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button